Wed, Apr 24, 2019 07:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › SSC Result 2018 : दहावीचा निकाल जाहीर; येथे करा चेक

SSC Result 2018 : दहावीचा निकाल जाहीर; येथे करा चेक

Published On: Jun 08 2018 11:28AM | Last Updated: Jun 08 2018 1:12PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्‍ट्र राज्य माध्यमिक व उच्‍च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर झाला. परीक्षेत राज्याचा निकाल ८९.४१ टक्‍के लागला असून यंदाही मुलींनीच ९१.९७ टक्‍के निकालासह बाजी मारली आहे.

आज सकाळी दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे शुक्रवारी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला आहे. 

कोकण विभाग अव्‍वल ठरला असून ९६ टक्‍के निकाल आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर विभाग राज्यात शेवटचा ठरला असून निकाल ८५.९७ टक्‍के इतका आहे. दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे शुक्रवारी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.

कोल्‍हापूर विभागाचा निकाल ९३.८८ टक्‍के, पुणे ९२.८, मुंबई ९०.४१ टक्‍के इतका आहे. 

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात १६ लाख ३७ हजार ७८३ नियमित तर ६७ हजार ५६३ पुनर्परीक्षार्थी आणि ४६ हजार ७ खाजगी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या काही काळापासून निकालाबाबत उत्‍सुकता होती. तसेच तारखेबाबतही गोंधळ सुरू होता. अखेर आज (दि. ८) निकाल जाहीर झाला.

विभागीय मंडळ निहाय टक्केवारी 

कोकण- 96

कोल्हापूर- 93.88

पुणे- 92.08

मुंबई- 90.41

औरंगाबाद- 88.81

नाशिक- 87.42

लातूर- 86.30

नागपूर- 85.97


इथे पहा निकाल 

दरम्यान विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर झाला आहे. तसेच www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच वेगळी सांख्यिकी माहीती उपलब्ध झाली आहे.

या केंद्रावर झाली परीक्षा

मंडळामार्फत राज्यात दहावीची परिक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १ मार्च ते २४ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये राज्यातील नऊ विभागीय मंडळातील एकूण २१ हजार ९८६ माध्यमिक शाळांमधील १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. ४ हजार ६५७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये १६ लाख ३७ हजार ७८३ नियमित विद्यार्थी तर ६७ हजार ५६३ पुनर्परीक्षार्थी आणि ४६ हजार ७ खाजगी विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषयांसह प्रविष्ट झाले. यामध्ये ९ लाख ७३ हजार १३४ विद्यार्थी व ७ लाख ७८ हजार २१९ विद्यार्थिनींचा समावेश आहे.