होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसच्या माजी आमदाराचे मुंबईतील ३३ फ्‍लॅट्‍स जप्‍त

काँग्रेसच्या माजी आमदाराचे मुंबईतील ३३ फ्‍लॅट्‍स जप्‍त

Published On: Apr 07 2018 9:07AM | Last Updated: Apr 07 2018 9:26AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने सिद्दीकी यांच्या कंपनीचे बांद्र्यातील ४६२ कोटींचे ३३ फ्‍लॅट जप्‍त केले आहेत. मे. पिरॅमिड डेव्‍हलपर्स या सिद्दीकींच्या कंपनीने अतिरिक्‍त चटई निर्देशांक (एफएसआय)साठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

काही दिवसांपूर्वीच याच प्रकरणात सिद्दीकीचा सहकारी बिल्‍डर रफीक मकबूल कुरैशी याच्यावरही ईडीने छापे टाकले होते. बांद्रा येथे असणार्‍या जमात ए जम्‍हूरियत मलिन वसतीच्या पुनर्वसन योजनेत घोटाळा झाला आहे. या १०८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली. दरम्यान, हे प्रकरण २०१२ मध्ये मुंबईतील एका स्‍थानिक ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली होती.

Tags : SRA scam, ED, baba siddique, mumbai, mumbai news, congress