Sun, Nov 18, 2018 09:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता एसआरएतील सदनिका बँकांमध्ये तारण ठेवता येणार

आता एसआरएतील सदनिका बँकांमध्ये तारण ठेवता येणार

Published On: Mar 11 2018 1:52AM | Last Updated: Mar 11 2018 1:27AMमुंबई  : प्रतिनिधी

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांना एसआरए सदनिका  बँकांमध्ये तारण ठेवून कर्ज  देण्याच्या  ठरावाची सूचना भाजपा नगरसेवक तथा मालाड सहकारी बॅँकेचे अध्यक्ष विनोद मिश्रा यांनी मुंबई महापालिकेत मांडली. याला पालिका सभागृहात मंजुरी मिळाली असून पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. 

नागरिकांना एसआरए प्रकल्पातील सदनिका 10 वर्षे विकता येत नाही. असा नियम असल्याने अनेकांना विविध गरजांसाठी मोठी आर्थिक अडचण निर्माण होते. अशावेळी सदनिका बँकेकडे तारण ठेवल्यास त्यांना कर्ज उपलब्ध होऊन त्यांचे कामही पूर्ण होऊ शकते. वैद्यकीय उपचार, पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी विविध बँका, पंतसंस्थांकडून  कर्ज घ्यावयाचे असल्यास त्यांच्या सदनिका तारण ठेवण्यासाठी एसआरएकडून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे.  त्यामुळे सदनिकाधारकांना अडचणीच्या काळात आर्थिक सहाय्य मिळेल, अशी सूचना नगरसेवक मिश्रा यांनी मांडली. यासाठी मुंबईतील अनेक सहकारी बँका, पंतसंस्था पुढे येेण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.