Fri, Apr 26, 2019 03:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ९५ लाखांचे विदेशी चलन सोन्यासह तिघांना अटक

९५ लाखांचे विदेशी चलन सोन्यासह तिघांना अटक

Published On: Jun 11 2018 1:34AM | Last Updated: Jun 11 2018 12:54AMमुंबई : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिलेसह दोन प्रवाशांना रविवारी हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. या दोन्ही प्रवाशांकडून या अधिकार्‍यांनी सुमारे 95 लाख रुपयांचे विदेशी चलन आणि सोने जप्त केले आहे. या दोघांविरुद्ध फेमा आणि सीमा शुल्क कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

सैफुउद्दीन कुलाठिन हा भारतीय नागरिक असून रविवारी तो पहाटे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाण्यासाठी आला होता. त्याच्याकडे दुबईला जाण्यासाठी इंडिगो एअरवेजचे एक तिकिट होते, विमानतळावरच त्याला हवाई गुप्तचर विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना विविध विदेशी चलन सापडले. त्यात 40 हजार 550 युएसडी डॉलर, 2 लाख 14 हजार 780 सौदी रियाल, 2 हजार 775 ओमान रियाल, 37 हजार 600 युईए दिराम, 255 बेहरीन दिनार, 40 कुवेत दिनार, 1500 कतारी रियाल असे विदेशी चलनाचा समावेश होता. 

या विदेशी चलनाची भारतीय बाजारात सुमारे 76 लाख रुपये आहे. ते विदेशी चलन घेऊन तो दुबईला जाणार होता. तिथेच त्याला एका व्यक्तीला ते विदेशी चलन द्यायचे होते. ही कारवाई ताजी असतानाच दुसर्‍या कारवाईत रबिया अब्दल रेहमान तवुर मोहम्मद या महिलेस ताब्यात घेतले होते. 

तिच्या बॅगेतून या अधिकार्‍यांनी सुमारे वीस लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. ते गोल्ड तिने कपड्यामध्ये लपवून आणले होते. रबिया ही अदिसअबाबा येथून इथोपियन एअरवेजमधून मुंबईत आली होती.