होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तूर भरडाईमध्ये दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा!

तूर भरडाईमध्ये दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

शेतकर्‍यांकडुन खरेदी केलेल्या तुरीपासून डाळ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये सरकारने आपल्या मर्जीतील सप्तश्रुंगी नावाच्या कंपनीला टेंडर दिले असून या प्रकरणात 2 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी विधानपरिषदेत केला. म्हाडा, अग्निशमन उपकरणे खरेदी प्रकरण, महापुरुषांचे फोटो खरेदी, पुणे एमआयडीसी जमीन घोटाळा आणि आरोग्य खात्यातील घोटाळ्यांवर बोट ठेवत विरोधकानी सरकारची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांच्यावतीने मंगळवारी विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला. प्रस्ताव मांडला असताना संबधीत विभागाचे मंत्री उपस्थित नसल्यामुळे विरोधकानी संताप व्यक्त केला. यामुळे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी पाच मिनीटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकुब केले.

कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी अनेक विभागांचे घोटाळे पुराव्यासह मांडून सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार क्‍लिनचिट देणारे वाशिंग मशिन असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, एकनाथ खडसे यांना क्‍लिनचिटचा लाभ मिळाला नाही. ते कमनशिबी असल्याची कोपरखळी त्यांनी लगावली. 

विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणातुन सरकारच्या शेतकर्‍यांकडील तुर खरेदी आणि तुर भरडाईवर बोट ठेवले. मागील वर्षी खरेदी केलेल्या तुरीपासून डाळ बनविण्याचे काम सप्तशृंगी कंपनीला देण्यासाठी 2 वेळा निविदा काढण्यात आल्या. डाळ बनविण्याची कोणतीही यंत्रणा नसताना त्यांच्यासाठी निविदेच्या अटीत वारंवार बदल केले, भरडाईसाठी दररोज 2 हजार मेट्रिक टन क्षमता आवश्यक असताना  केवळ 50 मेट्रिक टन प्रतिदिन भरडाईची अट टाकल्यामुळेच गोदामांमध्ये लाखो मेट्रिक टन डाळ पडून असल्याचे त्यांनी सांगितले.  या प्रक्रियेत फेडरेशनने घेतलेल्या 1400 कोटी रुपयांवर व्याज द्यावे लागत आहे, सप्तश्रुंगीचा डाळ बनविण्याच्या प्रक्रियेतील कमी उतारा मान्य करुन 508 कोटी रुपयांचा तोटा सहन केल्याचा आरोप त्यांनी केला. पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या तोंडी आदेशावरुन  निविदा प्रक्रियेत बदल झाल, असा आरोपही त्यांनी केला.

सप्तश्रुंगी कंपनीच्या निकृष्ट डाळ प्रकरणी मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाचाला कृषी साहित्य वाटपाचे दिलेले काम, कृषि महोत्सवाच्या नावाखाली जादा दराने नजीकच्या कार्यकर्त्याला इव्हेंट कार्यक्रमाचे दिलेले टेंडर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडील तीन डिन नंबर,म्हाडा प्राधिकरणातील घोटाळे, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ट्रक टर्मिनलकरिता काढलेल्या निविदेत 2 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार व उंदीर घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला.

Tags : mumbai news, Rs 2000 crore, scam,  Tur bharadai,  


  •