Tue, Jan 22, 2019 03:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रोहित, रहाणेला शिवछत्रपती पुरस्कार

रोहित, रहाणेला शिवछत्रपती पुरस्कार

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 2:08AMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. यामध्ये 2016-17 सालचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार कोल्हापूरच्या बिभीषण पाटील यांना जाहीर झाला आहे. यासोबत पुण्याच्या रमेश तावडे (2014-15) आणि अरुण दातार (2015-16) यांनाही जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रुपये 3 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गेल्या तीन वर्षांचे एकूण 195 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटर अजिंक्य रहाणे, क्रिकेटर रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना थेट शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.