Fri, Jan 18, 2019 17:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्वेलर्स मालकावर हल्ला करत ३ किलो सोने लुटले

ज्वेलर्स मालकावर हल्ला करत ३ किलो सोने लुटले

Published On: May 18 2018 2:20PM | Last Updated: May 18 2018 2:18PMपनवेल :  विक्रम बाबर

चॅपरचा धाक दाखवत कामोठे वसाहतीमधील  न्यू बालाजी ज्वलर्स दुकान लुटल्याची घटना गुरुवारी उशिरा रात्री साडेनऊ वाजता घडली.  यावेळी दुकानातील जवळपास 3 किलो सोने चोरट्याने लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकान मालकांवर हल्ला करून पळ काढला आहे. यात दुकान मालक जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कील कामोठे सेक्टर 36 मधील तिरुपती कॉम्प्लेक्समधील न्यू बालाजी ज्वेलर्सचे मालक सुमेश जैन रात्री दुकान बंद करण्याची्या तयारी होते. तेव्हा दुकानातील सोने बॅगेत भरत असता भरण्याचे काम करत असताना दुचाकीवरुन आलेले चोरटे दुकानात शिरले.त्यांनी दुकानाचे शटर बंद करुन मालकावर हल्ला केला. दुकानातील दागिने बॅगेत भरुन चोरांनी पोबारा केला. यावेळी दुकानातील 3 किलो सोन्यावर डल्ला मारल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात मालक गंभीर जखमी असून कामोठे येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  

चोरी करण्यापूर्वी दुकानातून विकत घेतली होती अंगठी
दुकानातून चोरी करण्यापूर्वी चोरट्यानी बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खरेदी केली होती. त्यांनी दुकानात येऊन १ ते २ ग्रॅमची सोन्याची अंगठी विकत घेतली होती. त्यांनतर काल रात्री साडेनऊच्या सुमारास दुकानात घुसून 3 किलो सोन्याची चोरी केली.