Mon, Mar 18, 2019 19:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रस्त्यावर दोन दिवस पार्क केलेली वाहने होणार जप्त !

रस्त्यावर दोन दिवस पार्क केलेली वाहने होणार जप्त !

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 12 2017 1:36AM

बुकमार्क करा

मुंबई  : प्रतिनिधी 

रस्त्यालगत बेवारस पडलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. पालिकेने वाहनाला नोटीस चिकटवल्यानंतर 48 तासांत वाहन न हटवल्यास ते वाहन जप्त करण्यात येणार आहे. यासाठी पालिका टोईंग व्हॅनची संख्या 10ने वाढवणार आहे. यापैकी परिमंडळात प्रत्यकी एक याप्रमाणे 7 टोईंग गाड्या तैनात ठेवणार आहेत. 

मुंबईतील रस्त्यासह पदपथ व सार्वजनिक ठिकाणी वाहने उभी करून, ती हटवण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या वाहन मालकांना धडा शिकवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2017 या दहा महिन्यांत मुंबई शहर व उपनगरांतून तब्बल 2235 गाड्या जप्त केल्या. यात 1 हजार 295 दुचाकी, 245 तीनचाकी व 695 चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. आता बेवारस वाहनांवरील कारवाई तीव्र करण्यासाठी मुंबईत सर्व्हे करण्यात येणार आहे. दरम्यान शहरात एखादी बेवारस गाडी आढळल्यास नागरिकांनी 1 हजार 916 या हेल्पलाईनवर फोन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. 

पालिकेकडे वाहन उचलण्यासाठी केवळ 6 टोईंग व्हॅन उपलब्ध होती. आता 10 टोईंग वाहने उपलब्ध करण्यात येणार आहेत. यापैकी 7 व्हॅन पालिकेच्या 7 परिमंडळांमध्ये तैनात ठेवण्यात येणार आहेत. परिमंडळ 2, 4 आणि 5 या तीन परिमंडळांची गरज लक्षात घेऊन तेथे प्रत्येकी 1 अतिरिक्त वाहन असणार आहे.