Sun, Sep 23, 2018 08:26



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रस्त्यावरील खड्डे कधी बुजवणार? 

रस्त्यावरील खड्डे कधी बुजवणार? 

Published On: Jan 11 2018 1:31AM | Last Updated: Jan 11 2018 12:22AM

बुकमार्क करा




मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील रस्त्यांवरील खड्यांमुळे  निष्पाप लोकांचे बळी बळी जात असताना यावर उपाययोजना करण्यास  पालीका आणि स्थानिक स्वराज्य संस्था अपयशी ठरल्या आहेत. रस्त्यांची देखभाल होत नसेल तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने खड्ड्यांच्या मुद्यावर सरकारचा चांगलेच धारेवर धरले.  या संदर्भात काय उपाययोजना  केली जाणार आहे ते दोन दिवसात सांगा, अशी तंबी  न्यायमूर्ती अभय ओक,  न्यायमूर्ती पी.एम.देशमुख यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिली.

न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेत  न्यायालयाने  स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे.त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती पी.एम.देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  तक्रार करूनही  खड्डे बुजवले जात  नाहीत. रस्त्यावर आजही मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे .पालीकेने तक्रार करण्यासाठी सुरू केलेले अ‍ॅपही बंद आहेत याकाड े न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. तर    31 दिसेबर पर्यंत पालिकेकडे खड्यांच्या संदर्भात   आलेल्या 239 तक्रारी पैकी 157 तक्रारींचे निवारण केल्याची माहिती पालीकेने  न्यायालयाला दिली. तसेच राज्य भरात आलेल्या  555 तक्रारींपैकी सुमारे 477 तक्रारींंचे निराकरण झाले नसल्याचे न्यायालयाने  अधिकार्‍यांच्या  निदर्शनास  आणून दिले. यावेळी खड्यांसंदर्भात योग्य त्या उपाययोजना अमलात येत नसल्याचे लक्षात येताच न्यायालयाने नाराजी व्यक्त करून राज्य सरकारला धारेवर धरले.

राज्यभरातील रस्त्यांची परिस्थिती खराब आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा उभारायला हवी ,वाहतूक पोलीसांची मदत घ्या , असा सल्ला देताना  उच्च न्यायालयाने  या सगळ्या गोष्टींवर तुम्ही नेमकं काय करणार आहात हे आम्हाला  दोन दिवसात सांगा असे बजावताना  याचिकेची सुनावणी  शुक्रावार 12 जानेवारी पर्यंत तहकूब ठेवली.