Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माहिती अधिकाराचा अर्ज आता ऑनलाईन

माहिती अधिकाराचा अर्ज आता ऑनलाईन

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:03AMमुंबई : प्रतिनिधी 

माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकाराचा अर्ज ऑनलाईन करण्याची सुविधा मुंबई महापालिकेने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या वेबसाईटवर लवकरच ही कार्यप्रणाली उपलब्ध होणार असल्याचे पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करणे अधिक सोपे होणार आहे.

2005 देशात लागू करण्यात आला. माहितीचा अधिकार वापरून माहिती मिळवणे योग्य असले तरी, अनेक ठिकाणी याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे मुळ उद्देश सफल होत नाही. व्यावसायिक तक्रारदार माहितीच्या अधिकाराचा वापर करून मिळवलेल्या माहितीचा गैरवापर करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. 

एखाद्या कामाबद्दल माहिती मिळाल्यानंतर, त्याचा आधार घेऊन तक्रार करणे हजारो आरटीआय कार्यकर्ते मुंबई शहरात आहेत. त्यांचा हेतू साध्य झाला की, माहितीच्या अधिकाराचा आधार घेऊन केलेल्या तक्रारी मागे घेण्यात येतात. त्यामुळे तक्रारीची दखल घेऊन पालिकेने चौकशी सुरू केल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने चौकशी थांबवणे भाग पडत आहे. त्यामुळे माहिती अधिकाराच्या गैरवापरला प्रतिबंध घालण्यासाठी पालिकेने एक वेबसाईट तयार करून, त्यावर अर्ज करणार्‍याचे नाव, कोणती माहिती मागवली, त्याचा तपशील आदी सविस्तर माहिती प्रसिध्द करावी, अशी ठरावाची सूचना भाजपाच्या नगरसेविका अलका केरकर यांनी पालिका सभागृहात मांडली होती.