Fri, Apr 26, 2019 01:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिक्षाचालकाने स्वतःला ब्लेडने केले जखमी

रिक्षाचालकाने स्वतःला ब्लेडने केले जखमी

Published On: Dec 03 2017 1:43AM | Last Updated: Dec 03 2017 1:12AM

बुकमार्क करा

अंबरनाथ : प्रतिनिधी

वाहतूक पोलिसाने केलेल्या कारवाईचा राग मनात धरून एका मद्यपी रिक्षा चालकाने वाहतूक पोलीस शाखेसमोरच स्वतःला ब्लेडने जखमी केल्याचा प्रकार घडला. सरकारी कामात अडथळा, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

ओव्हर सीट जाणार्‍या चंद्रकांत सोनवणे या रिक्षाचालकाला वाहतूक  पोलिसांनी अडवले व त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. कारवाई दरम्यान रिक्षाचालक दारूच्या नशेत असल्याने पोलिसांनी त्याला तीन हजारांचा दंड लावला. मात्र याचा राग मनात धरून रिक्षाचालकाने वाहतूक  शाखा कार्यालयाच्या बाहेरच स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रक्‍तबंबाळ  रिक्षाचालकाला पोलिसांनी रुग्णालयातही नेले. त्यानंतर त्याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रिक्षाचालकावर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असल्याने सध्या त्याला अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.