Sun, Feb 17, 2019 08:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाशच्या पेपरची फेरतपासणी

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाशच्या पेपरची फेरतपासणी

Published On: Feb 07 2018 5:10PM | Last Updated: Feb 07 2018 5:10PMमुंबई : प्रतिनिधी

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाशच्या पेपरची फेरतपासणी करण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिेले आहे.  अविनाश शेटे यांनी सहायक कृषी अधिकारी पदासाठी 2013 मध्ये परीक्षा दिली होती. त्यांच्या मागणीनुसार याबाबत फेरतपासणी करून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. असे कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. 

कृषिमंत्र्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी अविनाश शेटे यांना दुपारी दोनच्या सुमारास मंत्रालयात आपल्या दालनात बोलावून घेतले. त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी अविनाश सोबत त्याचे वडील देखील उपस्थित होते. अविनाशची कैफियत ऐकून घेतल्यानंतर कृषिमंत्र्यांनी  कृषी आयुक्तालयाला दूरध्वनीवरून सुचना देत याप्रकरणाची फाईल सोमवारी मंत्रालयात घेऊन येण्याचे निर्देश दिले.

अविनाशला वडीलकीच्या नात्याने समजावीत न्याय मागण्यासाठी आत्महत्या हा काही मार्ग होऊ शकत नाही. असा राग डोक्यात घालू नकोस, तुला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. जीव लाखमोलाचा आहे, अशा शब्दात फुंडकर यांनी त्याची समजूत काढली. 

अविनाशच्या म्हणण्यानुसार २०१३ मध्ये त्याने दिलेल्या सहायक कृषी अधिकारी पदाच्या परीक्षेत त्याला कमी गुण मिळाले. यावेळी दिलेल्या पेपरची फेरतपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार त्याच्या पेपरची फेरतपासणी करण्याचे कृषिमंत्र्यांनी सूचना दिल्या.

यावेळी कृषीमंत्र्यांनी अविनाशची आस्थेने चौकशी करून पुन्हा असा मार्ग पत्करू नको असे सांगितले. सुशिक्षित व्यक्तीने असे पाऊल उचलू नये याचा पुनरुच्चार करीत त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीही  दिली.