Sun, Oct 20, 2019 12:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › SBI ग्राहक आहात? मग आपल्यासाठी खुशखबर!

SBI ग्राहक आहात? मग आपल्यासाठी खुशखबर!

Published On: Jul 12 2019 5:44PM | Last Updated: Jul 12 2019 5:45PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्‍या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. स्टेट बँकेने आयएमपीएस, निफ्ट आणि आरटीजीएसवरील अतिरिक्त शूल्क आकारणे बंद केले आहे. त्यामुळे स्टेट बँकेचे ग्राहकांना आता बिनधास्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता येणार आहे. १ जुलै २०१९ पासुन YONO, इंटरनेट बँकिंग तसेच मोबाईल बँकिंगच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आलेली निफ्ट व आरटीजीएस ट्रान्झॅक्शनवर कोणतेच शुल्‍क आकारण्‍यात आलेले नाही. या सोबतच १ ऑगस्टपासून बँक IMPS वर आकरण्‍यात येणारे शुल्‍क देखील रद्द करण्‍यात येणार आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्‍या शाखेतून निफ्ट आणि आरटीजीएस करणार्‍यांना २० टक्‍के चार्जेस यापूर्वीच कमी केले आहेत. डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून हे पाऊल उचलण्‍यात आले. 

एसबीआयचे कार्यकारी संचालक पी. के. गुप्ता  म्‍हणाले की, ग्राहकांना सुविधा देणे व त्‍यांनी फंड ट्रान्सफर करण्‍यासाठी डिजिटल बँकिंगचा वापर करण्‍यासाठी त्‍यांना प्रोत्‍साहन देणे आमच्‍या रणनितीचा भाग आहे. आपली रणनिती आणि केंद्र सरकारचे डिजिटल इकॉनामी निर्माण करण्‍याचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी एसबीआयने बिना खर्च YONO, इंटरनेट बँकिंग तसेच मोबाईल बँकिंगला प्रोत्साहन देण्‍यासाठी अशा प्रकारचे अनेक निर्णय घेतल्‍याचे त्‍यांच्‍याकडून सांगण्‍यात आले. 

IMPS विषयी सांगायचे झाले तर बँक शाखेमार्फत एक हजारापर्यंत फंड ट्रांसफर करणार्‍या ग्राहकांना कोणतेच शुल्‍क द्‍यावे लागणार नाही.