Sat, Feb 23, 2019 14:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरोगसीच्या व्यापारीकरणावर येणार निर्बंध

सरोगसीच्या व्यापारीकरणावर येणार निर्बंध

Published On: Jul 03 2018 2:25AM | Last Updated: Jul 03 2018 2:25AMमुंबई : प्रतिनिधी

जन्मतःच गर्भाशय नसणे, गर्भधारणा होण्यात अडचणी, एखाद्या जोडप्याला मूल होण्यात काही अडचण असल्यास सरोगसीसाठी परवानगी दिली जाते. मात्र काही लोक या पर्यायाचा वापर केवळ पैसे कमावण्यासाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सरोगसीच्या माध्यमातून होणारे व्यापारीकरण रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून यासंदर्भातील कार्यप्रणाली निश्‍चित करण्यासाठी समिती गठीत केली आहे. 

जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर व इतर पाच जणांच्या विरोधात शुभांगी भोस्तेकर यांनी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे केलेल्या तक्रारीवरून सरोगसीच्या व्यापारीकरणावर निर्बंध आणण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत. 

त्यामुळे सरोगसीची कार्यप्रणाली निश्‍चित करताना भोस्तेकर प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करण्यात यावा. सरोगसीसाठी भाडोत्री गर्भ देणार्‍या स्त्रीचे व जन्म घेणार्‍या मुलाच्या भवितव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही विचार करावा.या सर्व प्रक्रियेमध्ये भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.