Wed, Jul 24, 2019 08:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचा  ठराव आज विधानसभेत

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचा  ठराव आज विधानसभेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या विमानतळाचेे शिल्पकार छत्रपती राजाराम महाराज यांचे  नाव या विमानतळाला देण्यात यावे असा ठराव सोमवारी विधानसभेत मांडण्यात यणार आहे. 

छत्रपती राजाराम यांनी अत्यंत दुरदृष्टीने कोल्हापूर संस्थानात 1939 साली विमानतळाची उभारणी केली.त्याकाळात कोल्हापूर मुंबई ही विमानसेवा पुणेमार्गे सुरू होती. कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनी उचललेले हे मोठे पाऊल होते. त्यांच्या या कार्याची  आठवण रहावी यासाठी त्यांचे नाव या विमानतळाला देण्याची मागणी कोल्हापुरच्या जनतेकडून वारंवार केली जात होती. 

मात्र त्यासाठी विविध परवानग्यांचा अडसर होता.  सरकारने आता या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव  देण्याचे ठरविले आहे. या नामकरणाची प्रक्रीयाही सरकारी पातळीवरून सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन नामकरणाचा असा प्रस्ताव नागरी हवाई वाहतुक विभागाकडे पाठविण्यासाठी राज्याच्या विधीमंडळाची त्याला मान्यता असण्याची गरज असते. सोमवार दि. 26 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  हा प्रस्ताव विधानसभेत मांडणार आहेत.त्यानुसार  कोल्हापूर विमानळाचे नाव हे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ कोल्हापूर असे करण्याबाबत केंद्र सरकारला  सुचविले  जाणार आहे. 

Tags : Resolution of giving the name of Chhatrapati Rajaram Maharaj to Kolhapur Airport Today in the Legislative Assembly


  •