Fri, Apr 26, 2019 15:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वांद्रे सरकारी वसाहतीतील रहिवासी तेथेच राहतील!

वांद्रे सरकारी वसाहतीतील रहिवासी तेथेच राहतील!

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:20AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मुंबईवर डोळा असलेल्या केंद्र सरकारचा मराठी माणसाचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. वांद्रे येथील सरकारी वसाहतीमधील रहीवाशांना हुसकावुन लावणे हा या प्रयत्नाचाच एक भाग असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला असून या वसाहतीमधील रहीवाशी येथेच राहतील. हिंमत असेल तर त्यांना घराबाहेर काढुन दाखवाच, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.

सरकारी वसाहतीमधील रहीवाशांच्या पुनर्वसन प्रश्‍नासंदर्भात वांद्रे येथील कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. आपल्या भाषणातुन राज यांनी सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन धोरणावर (एसआरए) टीका केली. ते म्हणाले, एसआरएच्या माध्यमातुन परप्रांतीयांना जागा देण्याचे काम सरकार करत आहे. या धोरणाआड सरकारने मराठी माणसाला घराबाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.  झोपडपट्टी पुनर्वसनसारख्या योजना खासगी बिल्डरला देऊन सरकार त्यांना मालामाल करत आहे. सरकारनेच या योजना राबवल्या तर महाराष्ट्रावरील कर्ज कमी होईल, असा दावा राज यांनी केला.

बाहेरच्या राज्यांमधून येणार्‍या लोकांसाठी जागा रिकाम्या करणे सुरु आहे. वांद्रे येथीलच बेहरामपाड्यात राज्यकर्त्यांच्या डोळ्यांदेखत चार-चार मजल्यांच्या झोपड्या उभ्या राहत असताना त्याकडे कोणी लक्ष देत नाही पण सरकारी वसाहतीमधील रहीवाशांना मात्र घराबाहेर काढण्याचे काम केले जात आहे. हे कदापी सहन करणार नाही, असा इशाराही राज यांनी दिला.