Wed, Sep 26, 2018 18:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महागाईचे चटके कायम..!

महागाईचे चटके कायम..!

Published On: Feb 08 2018 2:10AM | Last Updated: Feb 08 2018 2:10AMमुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कोणताही बदल न करता व्याज दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला. 2017-18 सालच्या विकास दरामध्येही घट करून हा दर 6.6 टक्क्यांपर्यंत आणला. आरबीआयने बुधवारी नवे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. यामध्ये व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट सहा टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे, तर रिव्हर्स रेपो रेटही 5.75 टक्क्यांवर ‘जैसे थे’ ठेवला आहे.