Tue, Jul 16, 2019 02:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेसबुकचे 'हे' भन्नाट फिचर तुम्ही पाहिले का?

फेसबुकचे 'हे' भन्नाट फिचर तुम्ही पाहिले का?

Published On: Dec 19 2017 2:02AM | Last Updated: Dec 19 2017 2:02AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

सोशल मीडियामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेल्या आणि अतिशय कमी कालावधीत प्रसिद्ध झालेल्या फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी आणखी एक नवीन पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. फेसबुकवर आता वाचाळवीर मित्र किंवा पेजची तात्पुरती बोलती बंद करणे शक्य होणार आहे. फेसबुकने यासाठी स्नूज नावाचे एक नविन भन्नाट फिचर युझर्संना प्रदान केले आहे. ज्यामुळे वाचाळवीरांच्या थिल्लर पोस्टपासून फेसबुक वापरणार्‍यांची सुटका होणार आहे.

भारतात फेसबुक वापरणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यात तरुण वर्गाचे प्रमाण जास्त आहे. अनेकदा अनोळख्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्याच्याशी फेसबुकवर मैत्री केली जाते. पण कधी कधी मैत्रीला प्रतिसाद मिळाला नाही किंवा एखाद्या व्यक्तीवर राग काढण्यासाठी बनावट खाते तयार करुन समोरच्या व्यक्तींविषयी वाटेल तसा मजकूर फेसबुकवॉलवर पोस्ट केला जायचा, त्यातून त्याची बदनामी किंवा त्याला त्रास देणे शक्य होत असे. पर्यायाने अशा फेसबुकवरील वाचाळवीरांना पर्यायाने अनफ्रेंड करावे लागत असे, किंवा अनफोलो करावे लागत असे. मात्र फेसबुकने अशा वाचाळवीरांचे तोंड बंद करण्यासाठी किमान महिनाभर स्नूझ करुन त्याच्या कटकटीपासून सुटका करता येणे शक्य झाले आहे.

फेसबुकच्या श्रुती मुरलीधरन यांनी एक ब्लॉग पोस्ट केला आहे. ज्यामध्ये युझर्संना त्यांना हव्या त्या गोष्टी पाहण्याचा आणि न पाहण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. 

स्नूझचा फायदा

या पर्यायामुळे सुमारे दोन बिलियन ग्राहकांना नको असलेल्या पेज, मित्रांकडील नोटिफिकेशन्स बंद करता येणार आहेत. त्यामुळे पूर्वी आपण लोकांना ब्लॉक करायचो तसे ब्लॉक करावे लागणार नाही.

ऑप्शन नेमका कुठे आहे?

कोणत्याही पोस्टच्या उजव्या बाजूला तीन डॉटस असतात. त्यावर क्लिक केल्यावर डाऊन ऑप्शनमध्ये स्नूझ हा पर्याय असेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्ती, पेज, ग्रुप यांच्या मेसेजपासून सुटका मिळवू शकता. म्हणजेच त्या व्यक्तीचे किंवा ग्रुपचे मेसेज तुम्हाला तुमच्या वॉलवर दिसणार नाहीत.