Tue, Apr 23, 2019 23:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : काँग्रेसचा प्रजातंत्र बचाव दिवस

मुंबई : काँग्रेसचा प्रजातंत्र बचाव दिवस

Published On: May 18 2018 1:55PM | Last Updated: May 18 2018 1:55PMमुंबई : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षातर्फे आजचा दिवस राज्यभरात  प्रजातंत्र बचाओ दिवस म्हणून पाळत जात आहे. लोकशाही विरोधी भाजप सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे मुंबई येथे अमर जवान ज्योती जवळ महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आ. चरणसिंग सप्रा,  मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्तेही धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.