Tue, Feb 19, 2019 20:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : नव्या नळ जोडण्या घेणाऱ्यांना दिलासा  

ठाणे : नव्या नळ जोडण्या घेणाऱ्यांना दिलासा  

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

अंबरनाथ व बदलापूर येथील नव्याने नळ कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  आता ५०० स्केअर फुटाच्या आत घर असणाऱ्यांना तीन हजार तर ५०० ते १००० स्केअर फुटाच्या आतील घरांना ५ हजार रुपये एवढेच भांडवली अंशदान द्यावे लागणार आहे. या निर्णयाने शहरातील नवीन कनेक्शन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या  बैठकीमध्ये या निर्णयाला मान्यता दिली.

अंबरनाथ मुंबईला लागून असणारी अंबरनाथ व कुळगांव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या पाणी पुरवठयाच्या आवश्यकतेनुसार शासनाने या दोन्ही शहरांसाठी अमृत योजना मान्य केली आहे.  या योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत २३ कोटी एवढा निधी भांडवली खर्चासाठी त्याचा हिस्सा म्हणून खर्च करणार आहे.  या खर्च होणाऱ्या भांडवली खर्चामुळे अंबरनाथ व कुळगांव बदलापूर  याठिकाणी नवीन कनेक्शन घेण्यासाठी भांडवली अंशदानापोटी प्रती घन मीटर रुपये ४२ हजार ९६४ इतका भांडवली खर्च येत होता हा खर्च कमी करण्याबाबत या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी २२ मे २०१७ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने  यांची फेरतपासणी करुन हे भांडवली अुशदान कमी करण्याचे निर्देश दिले होते.  याबाबींची तांत्रिक तपासणी करुन प्रशासनाने या अंशदानाचा दर रु.10492/- इतका प्रति घन मीटर असावा अशी शिफारस केली त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला.  

Tags : thane district, ambarnath, badlapur, pipeline


  •