Wed, Jan 23, 2019 23:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनी निर्बंध मुक्त करा - मुख्यमंत्री

प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनी निर्बंध मुक्त करा - मुख्यमंत्री

Published On: May 07 2018 3:58PM | Last Updated: May 07 2018 3:58PMमुंबई : प्रतिनिधी

राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी ज्या व्यक्तींनी जमिनी दिल्या आहेत. त्यांच पुनर्वसन करण्यासाठी ज्या जमिनी देण्यात आल्या आहेत, त्या निर्बंधमुक्त कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात दिले.

वर्धा येथील अमर राऊत यांनी पुनर्वसनासाठी राखीव ठेवलेल्या क्षेत्राचे  संपादन झाले नाही आणि ते विकण्याची परवानगी मिळत नसल्याबाबत अर्ज दाखल केला होता. याच संदर्भात माणिक मलिये यांनी देखील तक्रार दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्तांच्या ज्या जमिनी आहेत त्यांना वर्ग एकचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही झाली पाहिजे. ज्या जमीनींचे वाटप झाले आहे त्यावरील निर्बंध काढून त्यांना वर्ग एकचा दर्जा देण्यात यावा. पुनर्वसित व्यक्तीला ज्या सवलती दिल्या आहेत त्या निर्बंधमुक्त कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.