Thu, Sep 20, 2018 00:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिद्धिविनायक टपाल तिकीटाचे लोकार्पण

सिद्धिविनायक टपाल तिकीटाचे लोकार्पण

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 11 2018 1:08AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सातत्याने प्रगती करीत राहील. लोकापर्ण झालेले सिद्धिविनायक मिंंदराचे पोस्टल तिकीट सर्वांच्या घरी शुभवार्ता घेऊन जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला.  

भारतीय डाक विभागातर्फे माय स्टॅम्प या योजनेअंतर्गत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट तयार करण्यात आले आहे. या तिकीटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी मंदीरात झालेल्या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले की, श्री. सिद्धिविनायक हे तमाम मुंबई आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात. मी श्री सिद्धिविनायक चरणी  महाराष्ट्रावरची सर्व संकटे दूर करण्याची प्रार्थना केली असल्याचेही ते म्हणाले.  

दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना या योजनेंतर्गत आपला स्वतःचा, परिवाराचा, मित्रांचा, नातेवाईक यांचा फोटो श्री सिद्धिविनायक मंदिर टपाल तिकीटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.