Tue, Apr 23, 2019 18:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिंचोटी धबधब्यातून शंभर पर्यटकांची सुटका 

चिंचोटी धबधब्यातून शंभर पर्यटकांची सुटका 

Published On: Jul 07 2018 9:33PM | Last Updated: Jul 07 2018 9:33PMनालासोपारा : प्रतिनिधी

वसईच्या चिंचोटी धबधब्यावरील ९७ लोकांना वाचवण्यात आलेले असून, एका पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. भावेश गुप्ता (वय ३०) असे मृतदेह सापडलेल्‍या व्यक्‍तीचे नाव आहे. हेलिकॉप्टर, वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, एनडी आरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचाव कार्य सुरु आहे.

आज मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी धबधब्यात मौज  मजा करण्यासाठी अनेक गृप आले होते. यावेळी अचानक भरपूर पाऊस पडला आणि धबधब्याच्या प्रवाहात अनेक लोक खडकावर, मध्येच अडकले. त्यांना सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व पोलिस पोहचले परंतु, पावसाच्या पाण्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. शेवटी आपत्कालीन यंत्रणेची हेलिकॉप्टर एनडी आरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचाव कार्य सुरु आहे. त्या ठिकाणी नेटवर्क नसल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. पाण्याचा अचानक प्रवाह वाढल्याने एकजण वाहून गेल्याची माहिती पर्यटकांनी दिली.