मुंबई : प्रतिनिधी
रुपेरी पडद्यावर सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळे स्थान आहे. पहिल्यांदाच स्मिता पाटील यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि अमृता सुभाष यांना जाहीर झाला आहे.
विलेपार्लेचे आमदार अॅड. पराग अळवणी, आर्च एंटरटेनमेंटचे विनीत आणि अर्चना गोरे, जीवनगाणीचे प्रसाद महाडकर आणि स्मिताची जवळची मैत्रीण ललिता ताम्हणे या सर्वांनी एकत्र येऊन हा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. 13 डिसेंबर 2017 या स्मिताच्या 31 व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने यावर्षीपासून व पुढील प्रत्येक वर्षी स्मिता पाटील पुरस्कार देण्याचे जाहीर त्यांनी केले आहे. शनिवार, 16 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे पुरस्कार सोहळा होणार आहे.