Tue, Jul 16, 2019 13:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणी सुरू

म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणी सुरू

Published On: Jul 20 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी 

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 9 हजार 18 आणि नागपूर मंडळाच्या 1 हजार 514 सदनिकांच्या विक्रीच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. यावेळी म्हाडाच्या माहिती व संचार तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या संगणकीय सोडत प्रक्रियेच्या आज्ञावलीचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांनी पाहिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र शासन सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीकरीता कटिबद्ध आहे. म्हाडाच्या कोकण मंडळ आणि नागपूर मंडळाच्या अखत्यारितील विविध उत्पन्न गटांकरिता सुमारे दहा हजार सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. 

यामध्ये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोकण मंडळाच्या 3 हजार 937 सदनिका तर नागपूर मंडळाच्या 1 हजार 514 सदनिकांकरिता केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान मिळणार असल्याने या सदनिका नागरिकांना परवडणार्‍या दरात उपलब्ध होणार आहेत. यासाठी या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.