Mon, Feb 18, 2019 05:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बारावी फेरपरीक्षेचा निकाल घसरला 

बारावी फेरपरीक्षेचा निकाल घसरला 

Published On: Aug 25 2018 1:33AM | Last Updated: Aug 25 2018 1:31AMमुंबई : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेरपरीक्षेचा निकाल घसरला असून राज्यात ही परीक्षा दिलेल्या 1 लाख 2 हजार 160 विद्यार्थ्यांपैकी केवळ 23 हजार 140 विद्यार्थी उतीर्ण झाले असून तर मुंबई विभागात 29 हजार 57 विद्यार्थी बसलेल्या पैकी केवळ 5 हजार 600 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. यंदा राज्याचा एकूण निकाल 22.65 टक्के लागला मुंबई विभागाचा 19.27 टक्के लागला आहे.

गेल्यावर्षी राज्याचा निकाल 24.96 टक्के लागला होता यावर्षी 22.65 टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल 19.27 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी तो 18.74 टक्के लागला होता. 

येत्या 27 ऑगस्टपासून विद्यार्थी गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात. 5 सप्टेंबरपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत आहे. ज्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे त्यांनी ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज करायचा आहे. पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून पाच दिवसांत अर्ज करायचा आहे.