Mon, Nov 19, 2018 04:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्राची महाभरती तूर्त मानधनावर 

महाराष्ट्राची महाभरती तूर्त मानधनावर 

Published On: May 18 2018 1:43AM | Last Updated: May 18 2018 1:32AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

पुढील दोन वषार्ंत 72 हजार शासकीय जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने तरुणांना नोकरीच्या नव्या संधी मिळणार आहेत. मात्र, या जागा शिक्षण सेवकाच्या धर्तीवर प्रथम पाच वर्षांसाठी मानधनावर भरण्यात येणार असून त्यानंतर पात्रता व कामगिरी तपासून त्यांना कायम नियमित केले जाणार आहे. 

राज्यातील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारने त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना अत्यावश्यक सेवा, सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी पुढील दोन वषार्ंत विविध खात्यांमध्ये महाभरती केली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षातच 36 हजार जागा भरल्या जाणार आहेत. मात्र, या जागा सध्या मानधनावर भरल्या जाणार आहेत. राज्य सरकारने या भरतीसंदर्भात काढलेल्या शासन आदेशात तसे स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्यस्तरीय संवर्गातील पदे भरताना पदोन्नती श्रेणीतील सर्वात खालचे  पद तसेच जिल्हास्तरावरील पदे ही शिक्षण सेवक, कृषी सेवक आणि ग्रामसेवकांच्या धर्तीवर प्रथम पाच वषार्ंसाठी मानधनावर भरण्यात यावीत व त्यानंतर पात्रता व कामगिरी तपासून त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. यासाठी भरतीचे नियम तयार करण्याच्या सूचना वित्त विभागाने जारी केल्या आहेत. राज्य शासन नोकर भरती करणार असल्याच्या घोषणेने राज्यभरातील बेरोजगारांना मोठा आनंद झाला होता. त्यावर या मानधन तत्त्वाने जरासे विरजनच पडले आहे.