Mon, Jul 15, 2019 23:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक; सरकारी रूग्णालयात उंदराने रूग्णाचा डोळा कुरतडला

धक्कादायक; सरकारी रूग्णालयात उंदराने रूग्णाचा डोळा कुरतडला

Published On: Apr 29 2018 3:22PM | Last Updated: Apr 29 2018 3:03PMमुंबई :  पुढारी ऑनलाईन

देशातील सरकारी रूग्णालयांची अवस्था कोणापासूनही लपलेली नाही. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. मुंबईच्या बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रूग्णालयात उंदरांनी एका रूग्णाचा डोळा कुरतडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उंदीर रूग्णाचा डोळा कुरतडत असताना प्रशासन मात्र झोपा काढत होते.

माझ्या मुलावर बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याला आयसीयुमधून जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.  पण, रात्रीच्या दरम्यान एका उंदराने त्याचा डोळा कुरतडला. सकाळी त्याच्या डोळ्याजवळून रक्त येत होते. त्याच्या शरीरावर आणि अंथरूणावर रक्ताचे डाग पडले होते, अशी माहिती तरूणाच्या वडीलांनी दिली. 

माझ्या मुलाचा अपघात झाला होता. त्याच्या मेंदूतील रक्त गोठले होते.  त्यांनंतर तो कोमात गेला होता. म्हणून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलाला आयसीयुमध्ये दाखल करण्यावेळीच आम्ही जनरल वॉर्डमध्ये उंदीर पाहिले होते. रूग्णालयातील उंदरांनी माझ्या मुलाचा डावा डोळा कुरतडला. या संदर्भात कोणतेही भाष्य करण्यास रूग्णालय प्रशासनाने टाळाटाळ केली, असल्याची माहितीही त्यांनी दिली. 


Tags : Rats,Patients, Eye, Bal Thackray Trauma Care Hospital