Wed, Nov 14, 2018 03:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिधापत्रिका-आधार जोडणे बंधनकारकच

शिधापत्रिका-आधार जोडणे बंधनकारकच

Published On: Feb 24 2018 8:07AM | Last Updated: Feb 24 2018 8:27AMमुंबई : वृत्तसंस्था

आधारकार्ड शिधापत्रिकेशी जोडणे अनिवार्यच असल्याचे मुंबई  उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढताना कोणताही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. एक मार्चपासून राज्यात बायोमेट्रिक रेशनकार्डधारकांनाच स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार आहे.  अन्‍नधान्य पुरवठा विभागाच्या सचिवांना सादरीकरण देण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

राज्यभरात अनेक ठिकाणी माहितीचे संगणकीकृत करताना चुका झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. एकट्या नाशिकमध्ये चुकीची माहिती अपलोड झालेल्या शिधापत्रिका 74 हजारांच्या वर आहेत.
पालकमंत्र्यांकडे तक्रार करूनही तोडगा निघाला नसल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात दिली. नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते अझिझ पठाण यांनी जनहित याचिका दाखल केली होती.