Thu, Sep 20, 2018 14:10



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बलात्कारी प्रियकराचा शोध अजून सुरूच

बलात्कारी प्रियकराचा शोध अजून सुरूच

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 1:43AM



मुंबई : प्रतिनिधी

अंधेरीतील भवन्स कॉलेजमध्ये शिकत असलेल्या 25 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी प्रियकराचा पवई पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 23 वर्षीय आरोपीला आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तो पसार झाला आहे.

साकीनाका परिसरात राहात असलेल्या या पीडित तरुणीला तिच्याच सोसायटीतील आरोपीने प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवत पवईच्या विहार लेक परिसरातील एका लॉजवर नेत तिच्यावर बलात्कार केला. गेले वर्षभर हा तरुण तिला याच लॉजमध्ये नेत तिच्यावर बलात्कार करत होता. गेल्या महिन्याच्या 21 तारखेला दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत कुटुंबीयांना समजले. त्यानंतर तरुणाने संपर्क तोडल्याने तिने 5 फेब्रुवारी रोजी पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पवई पोलीस तपास करत आहेत.