Fri, Jul 19, 2019 22:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मानसिक आधाराच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

मानसिक आधाराच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:41AMमुंबई ः प्रतिनिधी

जवळच्या मित्राच्या साखरपुड्याच्या वृत्ताने मानसिक तणावात गेलेल्या एका तरुणीा आधार देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरुन महेश लक्ष्मण कदम या 39 वर्षीय व्यावसायिकाला एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. 

28 वर्षांची ही पिडीत तरुणी फोर्ट परिसरात राहत असून तिथेच महेश कदम याचे महेश इलेक्ट्रीकल नावाचे एक दुकान आहे. गेल्या दहा वर्षांपासून ती महेश कदम याच्या परिचित होती. तिचे एका तरुणासोबत मैत्रीचे संबंध होते, त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र त्याचे दुसर्‍या मुलीशी साखरपुडा ठरल्याचे वृत्त समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या मानसिक धक्क्यात असताना तिला महेश कदम याने आधार देण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी जवळीक साधून तिला अलीबाग येथे आणले. तिथेच त्याने तिच्यावर जबदस्तीने बलात्कार केला होता. याबाबत कुठेही वाच्यता करु नये अशी धमकीही दिली होती. इतकेच नव्हे तर तिला 25 लाख रुपयांची प्रॉपटीची ऑफर देऊन गप्प करण्याचा प्रयत्न केला.

जून 2017 ते मार्च 2018 या कालावधीत त्याने तिला शिर्डी, टिटवाळा व इतर ठिकाणी असलेल्या लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. यावेळी तिला त्याने लग्नाचे आमिषही दाखविले होते. मात्र महेशकडून आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच तिने त्याच्या पत्नीला हा प्रकार सांगितला. या घटनेनंतर तो प्रचंड चिडला आणि त्याने तिला बघून घेण्याची धमकीही दिली होती. या धमकीनंतर तिने एमआरए मार्ग पोलिसांत महेश कदमविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी बलात्कारासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. त्याला येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.