Tue, Jun 25, 2019 14:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भवन्स कॉलेजमधील तरुणीवर बलात्कार

भवन्स कॉलेजमधील तरुणीवर बलात्कार

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी

भवन्स कॉलेजमध्ये शिकत असलेल्या 25 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायकप्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे तरुणीपेक्षा तिचा हा प्रियकर दोन वर्षांनी लहान असून पवई पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

साकीनाका परिसरात राहात असलेली 25 वर्षीय तरुणी अंधेरी पश्‍चिमेकडील भवन्स कॉलेजमध्ये तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. ती राहात असलेल्या सोसायटीमधील 23 वर्षीय तरुणासोबत दोन वर्षापूर्वी तिची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होताच या तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवत पवईच्या विहार लेक परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे या तरुणीच्या डोक्यामध्ये सिंदूर भरून आपण पती-पत्नी झाल्याचे सांगत तिच्यावर बलात्कार केला. गेले वर्षभर हा तरुण तिला याच लॉजमध्ये नेत तिच्यावर बलात्कार करत होता.