होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घरकाम करणार्‍या विधवेवर बलात्कार

घरकाम करणार्‍या विधवेवर बलात्कार

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 15 2018 12:52AMठाणे : प्रतिनिधी

मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी देत घरकाम करणार्‍या 29 वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार करणार्‍या व्यक्ती विरोधात मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश निंबरे (25, दिवा) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. 

आडीवली ढोकळी, कल्याण पूर्व येथे राहणारी 29 वर्षीय पीडित महिला विधवा असून तिला दोन मुली आहेत. पीडित महिला काही दिवसांपूर्वी दिवा येथे राहण्यास होती. यावेळी दिवा येथेच राहणारा ऋषिकेश निंबरे याने पीडित महिलेच्या मुलींना ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो वारंवार पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी करू लागला. मात्र त्यास पीडित महिलेने नकार दिला असता आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून कोल्हापूर येथे नेले व तेथे देखील महिलेचे लैंगिक शोषण केले. याच दरम्यान वारंवारच्या लैंगिक छळास कंटाळून पीडित महिलेने दिवा येथील घर बदलून कल्याण पूर्वेकडील आडीवली ढोकळी येथे राहण्यास गेली. मात्र तेथे देखील आरोपीने जाऊन पीडित महिलेस मारहाण करत तसेच मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अखेर वारंवारच्या छळास कंटाळून विधवा महिलेने मुंब्रा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीस बेड्या ठोकण्यात आल्या.

Tags : Mumbai, housework, widow, Rape, person, police complaint, Filed, Mumbai news,