Mon, Feb 18, 2019 20:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर बलात्कार

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 12:52AMठाणे : प्रतिनिधी 

विवाहित असताना देखील 27 वर्षीय परीचारिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या व्यक्तीविरोधात डायघर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जमील मेहमूद मिर्झा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो अचानक नगर, मुंब्रा येथील राहणारा आहे.

मुंब्रा परिसरातील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणारी 27 वर्षीय पीडित तरुणी कुटुंबासह अमृतनगर मुंब्रा येथे राहत होती. वडील आजारी असून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. दरम्यान, पीडित तरुणीच्या शेजारी राहणारा आरोपी जमील याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते. हेच आमिष दाखवून आरोपीने पीडित तरुणीचे जुलै 2017 पासून लैंगिक शोषण सुरु केले.

त्यानंतर तो विवाहित असल्याचे कळताच पीडित तरुणीने त्याच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच ती त्याला टाळत होती. मात्र, आरोपीने पीडितेस बदनामी करण्याची धमकी देत इतर कुठेही लग्न होऊ देणार नाही अशी आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अखेर पीडित तरुणीने याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार केली. मुंब्रा पोलिसांनी जमील याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तो डायघर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

Tags : mumbai, mumbai news, showing wedding bait, Nurse, Rape,