Sat, Jul 20, 2019 13:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन विद्यार्थिनींचे अपहरण करून बलात्कार

दोन विद्यार्थिनींचे अपहरण करून बलात्कार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : अवधूत खराडे

शाळेत जात असलेल्या दोन अल्पवयीन बहिणींना चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत तीन नराधमांनी त्यांचे टॅक्सीतून अपहरण करत निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जून महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही मुली प्रचंड दशतीखाली असून पोलिसांसह शाळेतील शिक्षकांनी त्यांचे समुपदेशन सुरू केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत माहीम पोलिसांनी दोन नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

माहीममध्ये 13 आणि 14 वर्षांच्या दोन बहिणी कुटूंबासोबत राहात असून घराशेजारील एका शाळेमध्ये शिकतात. जून महिन्यातील एका दिवशी सकाळी सातच्या सुमारास त्या चालत शाळेत जात होत्या. त्यांच्या मागावर आलेल्या नराधम वसीम रियाज शेख (30) याच्यासह फैजल आणि अन्य एका साथीदाराने दोघींनाही अर्ध्या रस्त्यात अडविले. हातातील एक बॉटल या मुलींना दाखवत आपल्यासोबत न आल्यास अ‍ॅसिड फेकण्याची धमकी या नराधमांनी मुलींना दिली.

मुली घाबरल्याचे लक्षात येताच नराधमांनी त्यांना एका टॅक्सीमध्ये बसवून येथील एम. एम. पी. रोडवरील दिघी टँक गार्डन परिसरातील निर्जनस्थळी नेले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर नराधमांनी त्यांना धमकावत पाण्यातून गुंगीचे औषध पाजले आणि त्यांच्याशी लैंगिक चाळे करत बलात्कार केला. सकाळी साडेसात वाजल्यापासून दुपारी साडेबारापर्यंत नराधमांचे लैंगिक अत्याचार सुरू होते. त्यानंतर नरधमांनी दोन्ही मुलींना घरी आणून सोडले. आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे मुली प्रचंड दहशतीखाली आहेत. 

मुलींनी शाळेत जाणे बंद केल्याने आई वडिलांनी आणि शाळेतील शिक्षकांनी त्यांच्याकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली. भीतीपोटी काहीच बोलत नसलेल्या या मुलींनी अखेर घडला प्रकार आईला सांगितला. मुलींवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून मध्यमवर्गीय आईसुद्धा घाबरली आहे. अखेर एका महिलेने माहीम पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर रोजी याबाबत तक्रार दिली. 

या तक्रारीवरून अपहरण करून विनयभंग आणि बलात्कार केल्याप्रकरणी भादंवि कलम 376, 363, 328, 354 आणि 34 यासह पोक्सो कायद्याच्या कमल 4, 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.