Tue, Mar 19, 2019 21:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रणवीर-दीपिकाचे वर्षाअखेरपर्यंत लग्‍न?

रणवीर-दीपिकाचे वर्षाअखेरपर्यंत लग्‍न?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था

बॉलीवूडची चर्चेत असलेली जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या विवाहाच्या चर्चांना उधाण आले आहे. या वर्षाच्या अखेरीस त्यांचे लग्‍न होणार असल्याचा दावा माध्यमांकडून दिल्या जाणार्‍या वृत्तांमध्ये केला जात आहे. दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबीयांनी लग्‍नाच्या चार तारखा ठरविल्या आहेत. त्यामध्ये सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांचा समावेश आहे.

या तारखांवर दीपिका-रणवीरने शिक्‍कामोर्तब करावयाचे राहिले आहे. अलीकडेच दोघेही मालदीवला व्हेकेशनसाठी गेले होते. त्यानंतर या दोन्ही परिवारांनी एकमेकांची भेट घेतली. तारखेप्रमाणेच लग्‍नाचे ठिकाणही निश्‍चित करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. विवाहसोहळ्यात नातेवाईक आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित राहणार आहे.

दीपिका आणि रणवीरला डेस्टिनेशन वेडिंग करायचे होते. मात्र, कुटुंबीयांना त्यांचे लग्‍न मुंबईतच करावयाचे होते. कारण रणवीरचे अनेक नातेवाईक मुंबईतच राहतात आणि सर्वांना रणवीरच्या लग्‍नाला उपस्थित राहता यावे, यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Tags : mumbai news, Ranveer-Deepika, wedding, end, of the year,


  •