Tue, Apr 23, 2019 21:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरेंचा मनसे पक्ष संपलाय : रामदास कदम

राज ठाकरेंचा मनसे पक्ष संपलाय : रामदास कदम

Published On: Jul 01 2018 7:54AM | Last Updated: Jul 01 2018 7:54AMमुंबई : प्रतिनिधी

प्लास्टिक बंदीच्या निर्णयाच सर्व स्तरातून लोक स्वागत करत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यापार्‍यांकडून सुपारी घेऊन शिवसेनेला बदनाम करण्याच काम सुरू केल आहे. मनसे पक्ष संपलाय असे म्हणत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. 

मुंबईत घाटकोपर येथे शिवसेनेच्या वतीने कापडी पिशव्यांच्या वाटपाचा कार्यक्रम रामदास कदम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान पत्रकारांनी राज ठाकरे प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला विरोध करत असल्याकडे लक्ष वेधन्यात आले. त्यावेळी पर्यावरण मंत्री कदम यांनी राज ठाकरे चुकीचे बोलत आहेत, खरतर या निर्णयाच त्यांनी स्वागत करायला हव होत. सबंध जगाने आज प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशाला याच यजमानपद मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. प्लास्टिक बंदीचा निर्णय एका दिवसात घेतलेला नाही. या निर्णयाला आताच विरोध करणारे नऊ महिने झोपले होते का? त्यांचा पक्ष संपला आहे. व्यापार्‍यांकडून सुपारी घेऊन ते शिवसनेला बदनाम करत आहेत. राज ठाकरे काळ्या मांजरासारखे या निर्णयाच्या आड येत असल्याचे ते म्हणाले. 

देशात सद्या 17 राज्यांत प्लास्टिक बंदी आहे. जागतिक निर्णय झाल्यावर महाराष्ट्राने त्याची प्रथम सुरुवात केली आहे. या निर्णयाच त्यांनी स्वागत करायला हव होत. सबंध जग नालायक आहे आणि मी फक्त एकटा लायक आहे, अस म्हणून चालणार नाही. प्लास्टिक बंदी ही आवश्यक वाब असून त्याच त्यांनी स्वागत करायला हव अशी अपेक्षा असल्याचे रामदास कदम म्हणाले.