Thu, Jun 27, 2019 09:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दक्षिण-मध्य मुंबईला आठवले यांची पसंती

दक्षिण-मध्य मुंबईला आठवले यांची पसंती

Published On: Aug 01 2018 1:31AM | Last Updated: Aug 01 2018 1:26AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

सध्या राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आता लोकसभेत जाण्यास उत्सुक आहेत.त्यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाला पसंती दिली आहे. वांद्रे येथे आयोजित केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईतील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत याबाबत त्यांनी घोषणा केली. इतकेच नाहीतर त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना  कामाला लागण्याचे आदेशही दिले.

रिपब्लिकन पक्षाच्या 61व्या स्थापना दिनानिमित 3 ऑक्टोबर रोजी ठाण्यात प्रचंड महामेळावा आयोजित करून रिपाइंचे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. आठवले सध्या महाराष्ट्रतून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. 1998 मध्ये ते दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. त्यानंतर पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. या मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी मतदारसंघात 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते.