Thu, Jul 18, 2019 04:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रमजानचे रोजे यंदा रोज १४ तास ४ मिनिट

रमजानचे रोजे यंदा रोज १४ तास ४ मिनिट

Published On: May 18 2018 9:09AM | Last Updated: May 18 2018 9:09AMनवी मुंबई : प्रतिनिधी

आज गुरुवारपासुन मुस्लिम समाजात पवित्र समजल्या जाणार्‍या रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, 15 जूनला हा उपवास संपणार आहे. रोज 14 तास 4 मिनिटे एवढा कालावधी हा उपवास केला जाणार आहे. पहाटे 4.43 ला सुरु होणारा उपवास संध्याकाळी 7.09 मिनिटांनी संपणार असल्याची माहिती रफिक इनामदार यांनी पुढारीशी बोलताना दिली.

रमजान पर्वाच्या उपवासाचा दिवसभरातील काळ गेली कित्येक वर्ष 12 ते 13 तास इतकाच होता. गेल्या वर्षी तो 14 तासांपर्यंत पोहोचला होता. मात्र यंदा त्यात आणखी 4 मिनिटांची वाढ झाली आहे. 17 मे ते 15 जूनपर्यंत रमजानच्या उपवास सुरु राहणार आहेत. यात पाण्याचा एक घोटही न घेता दिवसभर कडकडीत उपवास केला जातो. त्यानंतर म्हणजे रोजा सोडल्यानंतर रात्री सार्वजनिक फराळ केला जातो.

इस्लाममध्ये रोजाला धार्मिकदृट्या अतिशय महत्व आहे. रोजाच्या काळात सकाळी सूर्यदयापासून ते सूर्यास्तापर्यंत खानपान, चुकीच्या गोष्टी ऐकणे, पाहणे आदी बाबी धर्मबाह्य मान्यता जातात. एका अर्थाने आदर्श जीवन जगण्यासाठी मुस्लिम बांधव व्रतबंधन पाळतात. त्यानंतर नमाज फजर, जोहर व असरनंतर मगरीब (सायंकाळचा नमाज) केला जातो. त्यानंतरच रोजा सोडतात. ईशा आणि तराबीची नामाझी पठण करतात. सात वर्षाच्या बालकांपासून तर वयोवृदांपर्यंत रोजा केला जातो. रमजान पर्वाच्या उपवासाचे नियोजन असलेल्या वेळापत्रकाचे वाटप मशिदींम धून वाटप करण्यात आले आहे. यावर्षी रमजान पर्वाला मे च्या पंढरवाड्यातच सुरुवात होत असल्याने निम्मे पर्व उन्हाळ्यात संपणार आहे.

एपीएमसीच्या घाऊक बाजारात 1 किलोपासून 5 किलो पर्यंतचे परदेशी खजूरचे बॉक्स मागवण्यात आले आहेत. याकाळात खजूर, फळे यांना वाढती मागणी आहे. रोजाचा उपवास सोडताना फळांबरोबरच खजूरलाही मोठे स्थान मिळते. त्यामुळे 100 रुपयांपासून थेट 3 हजार रुपये किलोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या आकारातील खजूर पेंड पाहायवयास मिळत आहे.

इराकी शाखा नावाचा खजूर सर्वाधिक भाव खाऊन आहे. प्रतिकिलो 800 रुपये या दराने इराकी शाखा या खजूर पेंडची सध्या विक्री होत आहे. या पाठोपाठ केनिया इराणी, सलाम इराणी, नावाचा खजूर विकले जात आहे. सौदी अरेबिया ब्रँडखाली विकले जाणारे खजूर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये किलो तर इराणी नावाचे खजूरपेंड दीडशे ते दोनशे रुपये किलो या दराने सध्या उपलब्ध आहेत. भारतातील इंदूर या नावाने प्रसिद्ध असलेले खजूरपेंडही मोठ्या प्रमाणत उपलब्ध झाले आहे. परदेशातील अन्य खजूरच्या तुलनेत याचा दर अत्यंत कमी असल्यामुळे इंदूर खजूरला ग्राहक सर्वाधिक पसंती देत आहेत. याठिकाणातील इराकी शाखा व त्याची मागणी पहाता यंदा परदेशातील खजुरालाच अधिक भाव आहे.