Tue, Apr 23, 2019 01:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोनाली बेंद्रेच्या निधन ट्विटने राम कदम पुन्हा ट्रोल!

सोनाली बेंद्रेच्या निधन ट्विटने राम कदम पुन्हा ट्रोल!

Published On: Sep 07 2018 3:12PM | Last Updated: Sep 07 2018 4:22PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

घाटकोपर येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांबद्दल वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान त्यांनी या प्रकाराबाबत माफीही मागितली. हे प्रकरण अंगाशी आले असतानाच राम कदमांचा पुन्हा एकदा तोल सुटला आहे. त्यांनी चक्क अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचे निधन झाल्याचे ट्विट केले. यानंतर पुन्हा त्यांना ट्रोल केले गेले.

राम कदम यांनी सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबत ट्विय केल्यानंतर त्यांनी काही वेळातच ते डिलीट केले. मात्र, काही क्षणांत त्याचे स्क्रिनशॉट व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. सोनाली बेंद्रेच्या निधनाबद्दल ट्विट केल्यामुळे राम कदम यांची अवस्था अगीतून फुफाट्यात अशीच झाली आहे. 

अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबत केलेले  ट्विट डिलीट करुन त्यांनी अफवा असल्याचे ट्विट केले. ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून व्हॉटस्‌ॲपवर ही बातमी फिरत होती. ती अफवा होती. सोनाली बेंद्रेच्या आरोग्य आणि आयुष्यासाठी प्रार्थना करतो असे राम कदम यांनी म्हटले आहे.

Image may contain: Chetan Latukar, text

सध्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरवर परदेशात उपचार घेत आहे. नुकताच तिने पुस्तक वाचत असतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.