Tue, Jul 23, 2019 06:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे’

‘माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे’

Published On: Sep 06 2018 10:57AM | Last Updated: Sep 06 2018 10:59AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुलीने नकार दिला तर तिला पळवून आणू, असे बेताल वक्‍तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. त्यांनतर त्यांनी दिलीगिरी व्यक्त केली होती. तरीही त्यांना जोरदार विरोध करत राज्यभर निषेध व्यक्त करण्यात आला. अखेर या प्रकरणी त्यांनी ट्विटरवरुन माफी मागितली.

राम कदम यांनी ट्विटरवर म्हटले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे.

घाटकोपर दहीहंडी उत्सवात बोलताना राम कदम यांनी बेताल वक्‍तव्य केले होते. त्यानंतर राम कदम यांनी दिलगिरी व्यक्‍त केली. मात्र दिलगिरीने विरोधकांचे समाधान झाले नसून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी कदम यांच्या घरासमोर निदर्शने करीत त्यांचा निषेध केला होता. 

Image may contain: Chetan Latukar, smiling, text

वाचा : मुंबईत येते, बोट लावून दाखवा : पुण्याच्या मुलीचे राम कदम यांना जाहीर आव्हान