Sun, Apr 21, 2019 14:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेशी युती केल्यास भाजपबरोबर नाही : राणे

शिवसेनेशी युती केल्यास भाजपबरोबर नाही : राणे

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 2:02AMमुंबई : प्रतिनिधी

आगामी निवडणुकीत भाजपने जर शिवसेनेशी युती केली, तर आपण भाजपसोबत राहणार नसल्याचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात आपला समावेश होणार होता. मात्र, जर आपल्याला मंत्रिमंडळात घेतले, तर सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर जर भाजप शिवसेनेशी युती करणार असेल, तर भाजपसोबत राहण्यात अर्थ तरी काय, असा सवालही राणे यांनी केला. शिवसेना-भाजप युती होणार असेल, तर आपण भाजपबरोबर राहू नये असे आपल्याला वाटते, अशी भूमिका स्पष्ट करून राणे म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीत शिवसेना हाच आपला शत्रू नंबर एक असेल. 

Tags : mumbai, mumbai news, Rajya Sabha, MP Narayan Rane, Explaining, role, interviewing, the news channel