Mon, Apr 22, 2019 12:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रजनी पंडित यांना ११ पर्यंत पोलीस कोठडी

रजनी पंडित यांना ११ पर्यंत पोलीस कोठडी

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 12:28AMठाणे : वार्ताहर

अवैध सीडीआर खरेदी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या देशातील पहिल्या महिला डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांना बुधवारी न्यायालयाने 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे पंडित यांच्या वकिलांनी पंडित यांना जबाबासाठी बोलावले आणि अटक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणातील आरोपी मकवानाने दिलेल्या  माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्याहून अजिंक्य नागरगोजे आणि जसप्रीत सिंग यांना अटक केली.

जप्त केलेले सीडीआर आणि मोबाईल डाटा तपासायचा असल्याची सबब पुढे करण्यात आली आहे. पंडित यांनी कुठलाही सीडीआर हा अवैध घेतलेला नाही. पंडित या कायद्याच्या जाणकार आणि सुशिक्षित महिला आहे. त्यांनी अनेक केसेस सोडवल्या असून सरकारला अनेकवेळा मदत केलेली आहे. त्यांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळालेला आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणात भादंवि 420 व्यतिरिक्त अन्य कलमे लावली आहेत. याबाबत न्यायालयात आम्ही त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. केवळ पोलिसांनी सीडीआर तपासणीसाठी रिमांड हवा असल्याने कलमे लावली आहेत. याबाबत आम्ही हायकोर्टात रिट दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया रजनी पंडित यांचे वकील विशाल भानुशाली यांनी व्यक्त केली. 

यवतमाळच्या एसपीच्या वेबसाइटवरून 111 सीडीआर चोरले        

या प्रकरणातील आरोपी जिगर मकवाना हा गोडावून मध्ये आऊट सोर्सिंगचे काम करतो. त्याने लोकांची माहिती अजिंक्य नागरगोजे आणि जसप्रीत सिंग या दोघा आरोपींना विकली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागरगोजे आणि सिंग यांना पुण्यातून अटक केल्याची माहिती गुन्हे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. ताब्यातील आरोपी अजिंक्य नागरगोजे हा यवतमाळ येथील एसपी वर्मा यांच्या ऑफिशियल वेबसाईट डेव्हलप करत होता. या वेबसाईटचा पासवर्ड मिळवून त्याने तब्बल 111 सीडी काढून विकल्याचे तपासात समोर आले आहे. तर दुसरा आरोपी जसप्रीत सिंग हा व्होडाफोनच्या गोडाऊनमध्ये काम करीत होता. ग्राहकाचे नाव, पत्ता कंपनीच्या डाटामधून  काढून त्याने विकल्याचे तपासात समोर आले आहे.