होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजमाता जिजाऊंना जाधवराव कुटुंबीयांकडून अभिवादन! 

राजमाता जिजाऊंना जाधवराव कुटुंबीयांकडून अभिवादन! 

Published On: Jun 17 2018 2:08PM | Last Updated: Jun 17 2018 2:58PMमहाड : प्रतिनिधी  

राजमाता जिजाऊंना आज जाधवराव कुटुंबीयांच्या वतीने पाचाड येथिल जिजाऊंच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. पुढील वर्षांपासून तारखेनुसार ही पुणयतीथी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा निर्णय आज या कुटुंबीयांच्या वतीने घेण्यात आला. 

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे माहेर असलेल्या राजमाता जिजाऊंच्या 344 वषात प्रथमच संपूर्ण राज्यात पसरलेल्या सर्व जाधवराव कुटुंबीयांनी आज पाचाड येथे येऊन राजमाता जिजाऊंना अभिवादन केले .

जाधवराव कुटुंबीयांचे पुणे, वाघोली, परींचे ,भुईज, मालेगावकर,नांदेडकर,तसेच महाड या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबियांचे सदस्य राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून राजमातांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करावयाचा मानस या कुटुंबीयांनीही सिंदखेड राजा येथे झालेल्या जयंतीदिनी कार्यक्रमात व्यक्त केला होता. त्यानुसार आज राज्यातील विविध भागातून या जाधवराव कुटुंबियांच्या सदस्यानी एकत्रितपणे पाचाड येथे तारखेनुसार येणाऱ्या पुण्यतिथी सोहळा दिनी राजमाता जिजाऊंना अभिवादन करुन आशीर्वाद घेतले.

याप्रसंगी बोलताना अजय जाधवराव राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य स्थापने कामी केलेले कार्य अनमोल असल्याने सध्याच्या प्राप्त स्थितीमध्ये तयाचे मार्गदर्शन व विचार राष्ट्र उद्धारासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले .पुढील वर्षांपासून या पुण्यतिथी  सोहळ्याकरिता अधिक मोठ्या संख्येने कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी यावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिनिधिशी बोलताना स्पष्ट केले . 

तारखेनुसार राज्याभिषेक सोहळ्यानंतर बाराव्या दिवशी राजमाता जिजाऊंचे पाचाडमधे देहावसान झाले होते. यानिमित्ताने जाधवराव कुटुंबीयांशिवाय अनेक गावांतून तसेच विविध ठिकाणहुन आलेल्या शिवभक्त संघटनांच्या युवकांनी राजमाता जिजाऊ यांना पाचाड येथील समाधिस्थानी जाऊन अभिवादन केले आज या प्रसंगी महाड तालुका पोलिस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.