Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजस्थानी भट समाजाला झोपडी हिरावण्याची भीती!

राजस्थानी भट समाजाला झोपडी हिरावण्याची भीती!

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 1:11AMधारावी : अरविंद कटके

कठपुतळ्या नाचवून लोकांचे मनोरंजन करणार्‍या राजस्थानी भट समाजाला आपले राहते घर हिरावण्याची भीती सतावत आहे. सायन-कोळीवाड्यातील सीजीएस कॉलनी से.3 महात्मा गांधी झोपडपट्टीत दीड  हजारांच्या आसपास या समाजाची लोकवस्ती. पालिकेची तोडक कारवाई झाल्यास राहायचे कुठे? या चिंतेत ते दिवस ढकलत आहे.

राजांच्या राजवाड्यात कठपुतळी नाचवून त्यांचे मनोरंजन करणारे लोक अशी या समाजाची पूर्वीपासूनची ओळख. आजही ते ही आपली कला जतन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. आमच्याकडे सबळ पुरावे असूनही सरकारकडून कारवाई होणार आहे, असा त्यांचा आरोप आहे. 

गेल्या काही वर्षांपासून सभोवतालचे वातावरण बदलले आहे. दूरदर्शन, व्हिडीओ, मोबाईल फोन, इतर मनोरंजनाच्या साहित्यामुळे त्यांच्या हस्तकलेकडे लोकांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे त्यांची उपासमार होते. कलेला वाव मिळत नसल्याने कठपुतळी डान्स, लोकगीत, नृत्य, रोप नृत्यसारखी कला लोप पावण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी रहिवाशांना खोलीचे आश्वासन दिले जाते. त्यातच सरकारने पुरावे असूनसुद्धा  बेघर केल्याने संपूर्ण भट समाज बांधवांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे, अशी येथील रहिवाशांनी मागणी दिली.

गवताची पेंढी 1400 रुपये, बांबू - 200  रुपये, कापड -80  रुपये मीटर, सुतळी -150  रुपये किलो , सजावटीचे साहित्य -30  रुपये मीटर आहे. यापासून बनणारे प्राणी 300 ते 500 रुपयांपर्यंत विकले जातात. तर लाकडाच्या बाहुल्या बनवण्यासाठी आठ दिवस लागतात. त्यासाठी लागणार्‍या सागाच्या लाकडाची किंमत 500  रुपये घनफूट आहे. सरकारने आमच्या पारंपरिक कलेकडे पाहून आम्हाला मदत करावी, अशी त्यांनी मागणी केली.

Tags : Mumbai, mumbai news, Rajasthan Bhat, community hut issue,