होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेवर  बलात्काराचा गुन्हा

छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेवर  बलात्काराचा गुन्हा

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 1:40AMटिळकनगर/मुंबई : प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि गँगस्टर छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेवर टिळकनगर पोलिसांनी विनयभंगासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.  घणसोलीतील एका 22 वर्षीय तरुणीला लग्‍नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा निकाळजेवर आरोप आहे.

हा गुन्हा नवी मुंबई परिसरात घडल्याने त्याचा तपास पनवेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. पीडित तरुणी चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत राहते. 2014 साली तिची ओळख दीपक निकाळजेसोबत झाली. तिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने दीपकने तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली होती. याच दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिला पनवेल परिसरात पाटील नावाच्या एका व्यक्तीच्या फार्महाऊसवर, कर्जत येथील फार्महाऊसवर नेऊन  विनयभंग केला.  त्यानंतर 2016, 2017 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून जबदस्तीने शारीरिक संबंध ठेवला. लग्नास नकार दिल्याने  तिने पोलिसांत तक्रार दिली. 

टिळकनगर पोलिसांनी दीपकविरुद्ध 354, 376, 313 भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. टिळकनगर पोलिसांनी झीरो एफआयआर नोंदवून त्याचा तपास पनवेल पोलिसांकडे सोपवला होता. विनयभंगाचा गुन्हा एका फार्महाऊसमध्ये घडल्याने तिची सविस्तर जबानी नोंदवून हा तपास पनवेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दीपकने विधानसभा निवडणूकही लढविली होती. मात्र, त्याचा पराभव झाला होता. 

Tags : Rajan, brother, Deepak Nikalje, Rape crime, mumbai news