Wed, Jul 17, 2019 00:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नकाः राज ठाकरे

बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नकाः राज ठाकरे

Published On: May 01 2018 8:25PM | Last Updated: May 02 2018 1:19AMवसई : पुढारी ऑनलाईन

वसईतील सभेत मनसे राज ठाकरे यांनी आता या सभेनंतर ऑगस्‍टपर्यंत महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्‍यांनी नाणार प्रकल्‍प होण्याआधीच गुजरातच्या माणसांना येथील जमीन कशा काय खरेदी केल्या असा सवाल उपस्‍थित करून मोदी यांच्यावर निशाणा साधाला. याप्रसंगी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्‍हणजे रामदास पाध्ये यांचे बाहुले असल्याची टीका केली. 

राज ठाकरे यांनी नागरिकांना बुलेट ट्रेन आणि एक्‍स्‍प्रेस वेसाठी शेतकर्‍यांनी जमिनी देऊ नका असे आवाहन करून सरकारकडून जबरदस्‍ती करण्यात आली तर रूळ उखडून टाका असा आदेश सल्‍ला त्यांनी शेतकर्‍यांनी दिला. राज ठाकरे वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी या भागांना ते २ मे रोजी भेटी देणार आहेत. या दौर्‍यात ते शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

वसई येथील नरवीर चिमाजी आप्‍पा मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सध्याच्या राजकारणावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस सरकारवर जोरदार  टीका करण्याची शक्यता आहे.

पालघर राज ठाकरे सभा LIVE : महाराष्ट्र दौर्‍याला प्रारंभ

>महाराष्ट्रातील बांधवांनी नव्या महाराष्ट्रासाठी स्‍वप्‍नं बघावे

>महाराष्ट्रातील बांधवांनी बेसवाध राहू नका हेच सांगण्यासाठी आज आलो आहे

>राज्यासाठी करण्यासाठी १ मे हा दिवस एकमेव दिवस आहे

> नाणार प्रकल्‍प येण्याआधीच गुजरातच्या माणसांनी कशा खरेदी केल्या 

> इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील मुलांना का नाही नोकर्‍या मिळत

>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामदास पाध्ये यांचे बोलके बाहुले

>राजकारण्यातील सतत खोट्या बोलण्यामुळे मोदी सरकार मुळे न्यायालयातील शपथही बदलणार

 >मुंबई ते बडोदा एक्‍स्‍प्रेस वे बांधताना दुसर्‍या राज्यांचा विचार का केला जात नाही

 >सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला, आरक्षणामुळे जातीभेद वाढला 

 >महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या काळातील एक समाज, आज एकमेकांसाठी लढतोय : राज ठाकरे

 >ऑगस्‍टपर्यंत महाराष्ट्र पिंजून काढणार : मनसे अध्यक्ष राज ठाकरे

>वसई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभेला प्रारंभ