Thu, Jan 24, 2019 18:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरे मोदींना म्‍हणतात 'लोका सांगे..!'

राज ठाकरे मोदींना म्‍हणतात 'लोका सांगे..!'

Published On: Jun 26 2018 6:57PM | Last Updated: Jun 26 2018 6:57PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणी दिवसाची आठवण करून देत आज भाजपकडून भारतीतील राजकीय इतिहासातील काळा दिवस म्‍हणून पाळला जात आहे. आणीबाणीविषयी राजकारणाबरोबरच समाजकारणामध्येही विविध अंगाने चर्चा केली जात आहे. देशात पुकारलेल्या आणीबाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणी, इंदिरा गांधी यांच्याविषयी आगपाखड केली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनीही आपल्या व्यंगचित्रातून आणीबाणी आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी टिप्‍पणी केली आहे. 

No automatic alt text available.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूकवर आपल्या व्‍यंगचित्रातून आणीबाणीवर टिप्‍पणी करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि माजी पंतप्रमधान इंदिरा गांधी मोदी यांच्यावर टीका केली आहे. या व्‍यंगचित्रातून नरेंद्र मोदी यांच्या राजकारणामुळे देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.