Thu, Nov 15, 2018 01:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी अस्‍मिता ठिगळं लावलेली; राज यांचे फटकारे

मराठी अस्‍मिता ठिगळं लावलेली; राज यांचे फटकारे

Published On: Mar 01 2018 7:54AM | Last Updated: Mar 01 2018 7:54AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्‍या फेसबुकवरून व्यंगचित्राचा धडाकाच लावला आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून ते राजकीय टीका करत असतात. आज त्यांनी आपल्या फेसबुकवर ‘परंतु, आमचीच अस्‍मिता फक्‍त ठिगळं लावलेली’ या मथळ्याखाली एक व्यंगचित्र शेअर केले आहे. यातून मराठी भाषा ठिगळं लावलेली असल्‍याची टिपण्णी त्‍यांनी केली आहे. 

राज यांनी शेअर केलेल्‍या व्यंगचित्रात पाच स्‍त्रिया दाखवण्यात आल्‍या आहेत. त्‍यामध्ये ‘तमिळ', 'बंगाली', 'गुजराती', 'पंजाबी' आणि 'मराठी' भाषेच्या अस्मितेची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी अस्‍मिता ही जातीयवादात अडकली आहे. आगरी, बाम्‍हण, माळी, मराठा, दलित मातंग, वंजारी आणि इतर जातींचा दाखला देत मराठी अस्मितेची अवस्था ठिगळं लावलेली असल्याचा उल्लेख  राज यांनी व्यंगचित्रातून केला आहे.  

देशातील इतर सर्व भाषा एकसंघ आहेत मात्र, मराठी भाषा ठिगळं लावली असल्‍याचे राज यांनी या व्यंगचितातून दाखवले आहे. ‘मराठी अस्‍मिता ही जातींच्या पलिकडे जायला हवी’ अशी इच्छा राज यांनी व्यक्त केली आहे.