Sat, Nov 17, 2018 06:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरेंचा मोदींना व्यंगचित्रातून चिमटा

राज ठाकरेंचा मोदींना व्यंगचित्रातून चिमटा

Published On: Feb 09 2018 7:54PM | Last Updated: Feb 09 2018 8:01PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

'काँग्रेसने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना केले. त्याऐवजी सरदार पटेलांना करायला हवे होते,' असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतल्या भाषणात केले होते. त्यावर राज ठाकरेंनी मोदी आणि अमित शहा यांच्यावर व्यंगचित्रातून खोचक सवाल केला आहे.   

वाचा : अमिताभ बच्चन लिलावती रुग्णालयात 

राज ठाकरे फेसबुकवरून आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून राजकीय टीका करतात. त्यांची व्यंग चित्रे कायमच माध्यमांचे लक्ष वेधून घेत असतात. आज त्यांनी आपल्या फेसबुकवर एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. त्यात महात्मा गांधीजी, पंडित नेहरु, सरदार पटेल, नरेंद्र मोदी आणि अमित शहा एका सतरंजीवर बसले आहेत. गांधीजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची शाळा घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

गांधीजींच्या हातात भारताच्या इतिहासाचे पुस्तक आहे. या व्यंगचित्राच्या वरच्या बाजूला राज ठाकरेंनी गांधीजी मोदींना ‘नेहरुंना मी पंतप्रधान केले आहे. काँग्रेसने नाही आणि काँग्रेसच्या सरदार पटेलांचे पुतळे लावण्यापेक्षा हेगडेवार आणि गोळवलकर यांचे पुतळे का लावत नाहीस?’ असा सवाल करताना दाखवले आहे. या व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि शहांच्या इतिहासावर टोला लगावला आहे. सोशल मीडियावर हे व्यंगचित्र व्हायरल होऊ लागले आहे.